माझा कोंकण
माझा कोंकण
कोंकण म्हणजे धरती वरचो स्वर्ग.
नारळी फोफळीचो ताफो
आंब्या फणसांची काजुंची
रास
खळखळणारे धबधबे
वरुन शांत पण आतुन
खवळलेलो समूद्र
राब राब राबुन
गणपतीक शिंंमग्याक
लालपरिन नाहितर
कोकण रेल्वेन गावाकडे धावणारो
चाकरमणी
कोंकण म्हणजे
कौलारु मंदीरा
दशावतरी खेळ
आईची पालखी
पालखीत बेधुंद
नाचणारो कोकणी
जत्रेतील खाजा
भजी वाफाळलेला चहा
कोंकण म्हणजे
बांगड्याचो रस्सो
वडे सागोती
भाताची पेज
वालीची भाजी
कोंकण म्हणजे
कौलारु माडीची घरा
रात्रीच्या अंधारात
भुताखेतांच्या गजाली
सांगणारी म्हातारी कोतारी
कोंकण म्हणजे
बैलांशी बोलणारो
लाल मातीत राबणारो
शेतकरी
कोकण म्हणजे गरिबीत श्रीमंती
म्हणूनच म्हणतय
एकदातरी कोकणात येवा
आणि कोकणचो
रान मेवो खावा.
