पोळा
पोळा
काव्य प्रकार : शेल काव्य
सण पोळा बळीराजाचा
बळीराजाच्या दैवताला
मान बैलांना पोळ्यात
पोळ्यात सजवुनी बैलाला...
सायंकाळी भरतो पोळा
पोळा भरतो पटांगणात
पटांगणात नेती बैल जोड्या
बैल जोड्या एकाच रांगेत...
मंदिरासमोर बांधती तोरण
तोरण आंब्याच्या पानांचे बांधून
मान पोलीस पाटलाच्या जोडीस
जोडीस घेवून पाटील तोडतो तोरण...
काय थाट तो बैलांचा
बैलांचा पाहावा शिंगार
मनक्याचा हार गळ्यात
गळ्यात वाजती घुंगरं...
कपाळावर बेल्पत्री बांधून
बांधून चौरंग शिंगाला
काय शोभा त्या पोळ्याची
पोळ्याचे महत्व सणाला...
पोळा फुटल्यावर घरी
घरी येतात बैल घेऊन
राणी संगती बळीराजा
बळीराजा करती बैलाचे पूजन...
वर्षभराची साथ वृषभ राजा
वृषभ राजा देतो बळीराजाला
पुरणपोळीचा नैवेद्य देती
देती पोळ्याच्या सणाला...
