काळी माती
काळी माती
1 min
273
काळया मातीत मातीत
कष्ट करी रात्रंदिनं
हाल अपेष्टां सोसती
असं बळीचं जीवनं .........
काळी माती होय आई
जगविते ती सर्वांना
धान्य उगवी मातीतं
घास मिळे भुकेल्यांना .........
सोनं पांढरं पिकते
काळया मातीतं डोलते
कष्ट करी बळीराजा
अख्या जगाला पोसते ...........
काळया मातीत फुलली
फुलबाग गुलाबाची
कशी शोभून दिसते
लाल गुलाबी रंगांची ............
काळया मातीचे बनवी
माठ रांजण कुंभारं
पाणी साठवणीसाठी
काळया माठाचा आधार .............
