झाले ओलेचिंब रान
झाले ओलेचिंब रान
1 min
170
झाले ओलेचिंब रान
दिसे हिरवे शोभूनं
वाटे रम्य ते ठिकाणं
जाई रमुनिया मन. //१//
वाटे फिरावे रानातं
उंच डोंगर चढावां
खाली पडताना पाणी
धबधबा तो पहावां . //२//
झाले ओलेचिंब रानं
सातं रंगाची कमानं
दिसे नभात शोभूनं
काय निसर्गाची शानं . //३//
धरा नटली रंगांनी
शालू हिरवा नेसूनी
रान पाखरे आनंदी
झाडांवर ते बसुनी . // ४ //
तापलेल्या धरतीला
केलं थंड पावसानं
प्राणी पक्षी धरेवरं
बागडती आनंदानं . //५//