संतांचे माहेर
संतांचे माहेर
संतांचे माहेर / अवघी पंढरी /
चंद्रभागे तीरी / पंढरीत //
टाळ मृदुंगाचा / होतसे गजर /
भक्त सान थोर /भजनात //
दर्शनाच्या साठी / विठ्ठलाचे भेटी /
भक्तांचा हा मेळा /पंढरीत //
विठूचा गजर / करी भक्तजन /
गाती आनंदानं / वारकरी //
आषाढी पौर्णिमा / सण हा भाग्याचा /
लाभ दर्शनाचा / घेती जण //
एकामागे एक / राहुनी रांगेत /
ध्यास हा मनात / ठेवूनिया //
ओढ लागे जीवा / विठ्ठल पहावा /
अंतरी वसावा / विठुराया //
पंढरीला जावे / पदी लीन व्हावे /
डोळ्याने पहावे / विठ्ठलास //
चालल्यात दींड्या / घेवूनी पताका /
धरूनिया ठेका / तालावर //
विठ्ठल विठ्ठल / गजर करीत /
नाचती दिंडीत / वारकरी //