स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
वीर जवान लढले
देश मुक्त करण्याला
फासावर जे चढले
त्यांच्या सलाम कार्याला
क्रांती केली इंग्रजांच्या
विरोधात जनतेने
म्हणूनच मिळविले
स्वातंत्र्याला भारताने
अत्याचारा विरोधात
लढण्याचे बळ दिले
गांधीजींच्या प्रेरणेने
आम्हा स्वातंत्र्य मिळाले
क्रांती घडविली ज्यांनी
संत-महात्मे ते थोर
आहे अमर जगात
त्यांचे मौलिक विचार
शिल्पकार घटनेचे
भीमराव ते विद्वान
क्रांती प्रती क्रांती केली
देश ठरला महान
