बेरोजगारी
बेरोजगारी
1 min
206
हक्कासाठी लढणे आहे तुला
बेरोजगारी वाढली देशात
माणसाच्या जागी मशिनी आल्या
नव तरुणा तुझा झाला घात
उठ तरुणा जागा हो आता
लढण्याची वेळ आली तुझ्यावर
हाती धुपाटणे घेवून बसशील
नंतर वेळ निघून गेल्यावर
पिळवणूक करती ठेकेदार
मजुरी देईना मजुरांना
उठ कामगारा जागा होवुनी
बनव मजुरांची संघटना
शोषण करणाऱ्या विरूध्द
आवाज उठवायचा आहे तुला
संघर्ष केल्या शिवाय मिळणार नाही
कामगारा हक्क तुझे तुला
कामगार शोषणाच्या विरोधात
बंड फुकारणे आहे तुला
लोकशाही वाचाविण्या देशाची
कामगार जागृत करणे आहे तुला
