STORYMIRROR

Vijay Bhagat

Others

3  

Vijay Bhagat

Others

खारूताई

खारूताई

1 min
224

खारुताई खारुताई

येतेस का खाली

नाही नाही आता

आरामाची वेळ झाली .......


खारुताई खारुताई

काय करतेस बाई

बाळाला दूध पाजून

झोपविते बाई. ........


बाळ माझं झोपल्यावर

फिरायला जाईन

बाळा साठी चारा

घेऊन मी येईन ..........


अचानक सोसाट्याचा

वारा आला जोरात

खारुताई खाली आणि

बाळ झोपले घरट्यात ......


वारा थांबल्यावर गेली

खारुताई सरसर झाडावर

मोठी फांदी तुटली आणि

पडली घरट्यावरं ........


फांदीच्या वजनानं

घरट्यात दबली पिल्लं

पाहताच घरट्याकडे

डोळ्यात पाणी आलं .........


केविलवाणी खारुताई

रडे धाई धाई

वाचवा माझ्या बाळा

याहो चिऊताई .........


हळुवार घरट्यातून

बाळाला उचलले

आईला पाहताच

बाळ खुशीत आले ...........


Rate this content
Log in