राजमाता जिजाबाई
राजमाता जिजाबाई
1 min
230
राजमाता जिजाबाई
लेक होय जाधवांची
राजे शहाजीची पत्नी
आई राजे शिवबाची •••••••
शिवनेरी किल्ल्यावर
देई शिक्षण शिवाला
तलवार दांडपट्टा
चालविणे शिकविला ••••••
शिवबाची जिम्मेदारी
जिजाऊच्या खांद्यावर
देण्या शिक्षण शिवाला
घेई हाती तलवार •••••••••
मराठ्यांच्या स्वराज्याची
जिजाऊंची संकल्पना
केली शिवबांनी पूर्ण
केली स्वराज्य स्थापना ••••••••
शहाजीच्या मृत्यूमागे
शिवबाच्या राही पाठी
कधी घाबरली नाही
आई धैर्य देण्यासाठी ••••••••••