गीत निसर्गाचे गाऊ
गीत निसर्गाचे गाऊ
1 min
173
चला चला या सगळे
एक एक झाड लावू
जीव लावुनी जोपासू
गीत निसर्गाचे गाऊ. //१//
संवर्धन करू आम्ही
तोड थांबवू झाडांची
वाढवूणी झाडवेली
निगा राखू निसर्गाची . //२//
वृक्षतोड बंद करू
मनी एक ध्यास धरू
वृक्षवल्ली वाचविण्या
निसर्गाशी मैत्री करू . //३//
निसर्गाच्या सानिध्यात
मानवाचे रे कल्ल्यानं
सर्वां मिळे शुध्द हवा
जाई हरपूनी भानं . //४//
थांबविण्या प्रदूषणा
झाडा संगे मैत्री करू
झाडे लावूनी जगवू
निसर्गाचा ध्यास धरू . //५//