अभिलाषा
अभिलाषा
आई !माझ्या मनातलं सांगू का काही तुला ! मला जीवन जगण्याची आहे अभिलाषा....
मला जगायचे आहे जग पाहायचे आहे....
श्वास घेऊन स्वतंत्र अस्तित्वानं उमलायचं आहे...
आई तुझीच मी छोटीशी प्रतिकृती ....
तुझ्याच गर्भमातीतली मी आकृती .....
नको करू ग माझ्या आवृत्तीची विकृती...!
प्रकृतीचे वरदान मी सोड हीअपप्रवृत्ती ..!!
नको गं करू माझा तिरस्कार.....!!
मला दे जगण्याचा हक्क !!कर स्विकार ..!!
मी समजून घेइन तुला! आपण दोघी मैत्रिणी !
तू समजून घे मला आता , करते मनधरणी....
माझी अभिलाषा पूर्ण करणं तुझ्या हातात....
तुझी स्वप्न आकांक्षापूर्ण करी न मी जीवनात...
मी तुझंच प्रतिबिंब दोघींचा स्रित्वाचा पिंड...!
आता अडवू नकोस माझी खिंड......!!
मला मोठं करताना पूर्ण कर तुझ्या अभिलाषा..!!
माझ्या रूपानं नव्यानं जग शिकून
परिभाषा..!!