छत्रपती शिवाजीमहाराज- पोवाडा
छत्रपती शिवाजीमहाराज- पोवाडा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा
उगवली सोनेरी सकाळ।नियतीने साधली वेळ।जन्मास शिवाजी बाळ ।मुघलांचा कर्दनकाळ।
भोसले घराण्याचे कुळ।शिवनेरीला लाभले बळ।जी जी जी -१६३०
क्रांतिसूर्य जन्मास येऊन।छात्रपतींचे आदर्श बालपण।शूरवीरांची स्फूर्ती घेवून।दादोजी कोंडदेव संगतीन।लढाई- चे दिलेशिक्षण।जी जी जी
जिजाऊस होईना सहन।अन्याय केला कथन।शिवबाचे पेटले मन।रक्त अंगात आले सळसळुन।मातेस दिले वचन।हिंदुंचे करणार रक्षण।जी जी जी
महाराजांनी विचार केला।मावळे घेतले संगतिला।सर्व जाती धर्माचा समावेश केला।विश्वासू सरदार जोडीला।मुगलांस शह देण्याला।जी जी जी
भवानीचे आशीर्वाद राजाला।शक
्ती संचारली त्यांच्या अंगाला।
बळ मिळाले किल्ले जिंकण्याला।रयतेला आनंद झाला।
शूर योध्यांचा त्याग महाराष्ट्राला।जी जी जी
धसका घेतला मुघल सैनिकांन।शाहिस्तेखान होता लपून।
शाहिस्तेखानाची बोटे छाटून।जीवासरशी गेला पळून।आदिलशाहीची झाली धूळधान। जी जी जी
हिंदवी स्वराज्य स्थापनेला।राज्यभिषेक राजानी केला।रयतेला आनंद झाला।गागाभट्ट ब्राह्मण आला।
सुराज्य लाभले महाराष्ट्राला।जी जी जी (१६७४)
वीर पुरुष लाभला महाराष्ट्राला।न्याय दिला गोरगरीबाला ।
आयुष्य लाभले थोडे महाराजाला।वीर मरण लाभले महाराजाला। भारत देशाला।रायगड पवित्र जागेला। जी जी जी मृत्यू-(१६८०)