STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

2  

Sanjay Raghunath Sonawane

Others

माता पालक

माता पालक

1 min
276

माता पालक संघ असावा 

मुलगी वाचवा, तिला शिकवा 

ध्येय असावे तिच्या रक्षणाला

एकत्र या रे तिच्या भविष्याला  


गुपित सारे समजून घ्यावे 

उगाचच रागावून गप्प न करावे 

मैत्रीण म्हणून नाते जोडावे 

तिच्या विचारांशी एकरूप व्हावे 


भीती मनातील तिची घालावी 

निर्भयपणे जगण्याची हिम्मत यावी 

परिणामांची जाणीव व्हावी 

नव्या युगाची पहाट फुलावी 


माता पालक उद्देश समजवा 

घरोघरी जागृतीचा संदेश पोहचवा 

स्त्री जगण्याला आधार मिळावा 

स्त्री समानतेचा मंत्र जपावा  


शारीरिक, मानसिक विकास साधावा 

शाळाशाळांतून संदेश पोहचवा 

पिढ्या पिढ्यांचा विचार असावा 

त्यात कधी खंड न पडावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन