STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

हिरव्या रानात- कविता

हिरव्या रानात- कविता

1 min
756

हिरव्या, हिरव्या गर्द रानात

थंड वारा किती छान!

अंगाला स्पर्श करून जातो

जसा आमुचा मित्र महान 

  

आनंद देतो, दुःख मिटवितो

नवचैतन्य नित्य आणतो अफाट

साऱ्या विश्वाला सुखावतो तो 

जागवतो नव्या आशेची पहाट


साऱ्या सृष्टीला आनंद होतो

जेव्हा होते त्याचे आगमन

नव्या दिवसाची सुरुवात होते

सुगंधी, सुखद स्पर्शाने छान 


शांत तिमिरात नित्याने येतो

फुलवून जगाला नवी आशा

त्याच्या येण्याने साऱ्या विश्वाची

जाते जीवनातून कायम निराशा 


पाखरांचे थवे गगनी उडती

निरभ्र आकाश त्यांच्या सोबती

सर्वांना वाटतो हवा हवासा 

करतात सारे त्याच्याशी दोस्ती.


Rate this content
Log in