प्रेमाचा अर्थ
प्रेमाचा अर्थ
प्रेम हे दुःखाचे जोडीदार असते
विश्वासाचे प्रतिक असते
एकमेकांच्या भावनांचा दुवा असते
म्हातारपणाची काठी असते
प्रेम आनंदाचा सागर असते
दुखाची आई असते
आकाशासारखे विशाल असते
खरे काळीज जपणारे असते
प्रेम निस्वार्थ झिजणारे असते
कठीण प्रसंगाचे साथीदार असते
मनातील अदृश्य भावना असते
जीवनातील भव्य अमृत असते
प्रेम नवचैतन्य असते
आयुष्याची प्रेरणा असते
नव्या परिवर्तनाची नांदी असते
पाण्यासारखे निर्मळ असते