प्रिये ! आठव ती नशिली रात...
प्रिये ! आठव ती नशिली रात...


प्रिये ! आठव ती नशिली रात...
काही क्षण चाललो घेऊन हाती हात
साठवलेत मी ते क्षण मनःपटलावर
धाय मोकलून रडलो मी तू सोडून गेल्यावर
प्रेम असतं पवित्र , ईश्वरी भावना ...
प्रेम असतं आंतरिक उमाळा
म्हणतात ना दिल्याने प्रेम वाढते
प्रेमीयुगलांना मग का ते नडते ?
प्रिये ! कळत - नकळत प्रेम जडलं
खरं - खोटं तुझं तुला माहित
मी मात्र तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं
तुही माझ्यावरती बहुदा केलं असावं
प्रिये ! तू गेलीस तशी आठवणीहि तुझ्या सोबत ने खुशाल
मोडलेस सारी वचने ,शपथा, निदान स्वप्ने तरी तुझी घेऊन जा
परिस्थितीशी जुळवून घेणं तुम्हा स्त्रियांना चटकन जमतं
आम्हाला सावरण्यास मात्र आख्खा जन्म कमी पडतो ...
प्रिये ! तू भले ते मान्य करीत नसशील
मी प्रेम दिलं तुला मनस्वी , भरभरून ...
दिलेलं प्रेम आता परत कसं मागू ?
तूच सांग इतकं स्वार्थी कसं बरं वागू ?