STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action

3  

Abasaheb Mhaske

Action

तुम्हीच सांगा कसा मी ?

तुम्हीच सांगा कसा मी ?

1 min
28

कधी वाटते मानमर्जीचा मीच राजा 

कधी असहाय निराधार प्रजा मी 

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


मी गड्यानो स्वयंभू हरहुन्नरी 

मी दीड दमडीचा शिक्काही 

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


मी कोण अन जगतो कशासाठी ?

का मागतो लाचार जगण्याची भीक ही ?

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


मायेची छत्रछाया हरवली 

प्रेमाची माणसं दुरावली 

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


क्षणात सारं होत्याच नव्हतं झालं 

सारं कसं मी धुळीस मिळवलं ?

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


निरकूंश जगत राहिलो वाट्टेल तसा 

खात्री पटली मी तर भित्रा ससा 

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


मी न सच्चा माणूस झालो 

आदर्श पिता न पती ,मुलगा 

मज वाटते असा मी तसा मी 

तुम्हीच सांगा कसा मी ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action