STORYMIRROR

Sandhya Vaidya

Action

4  

Sandhya Vaidya

Action

अवेळी

अवेळी

1 min
460

सांग ना त्या पावसाला , नको येऊ असा अवेळी

गाव लांब आहे, भिजवू नकोस असा अवेळी


गात्रे झिजली पुरती ,ओझी वाहता वाहता

पेटलेल्या कलेवराची, धग विझवू नकोस अवेळी


जनजन आसुसलेले,परोपकार कर जरा

महापुरात जाती घरेदारे, रिचवू नकोस अवेळी


कलकलाट पक्षांचा, जीव मुठीत घेऊन 

घरट्यांची ती पडझड , घडवू नकोस अवेळी


ये असा असेल जेव्हा, गरज खरी सिंचनाची

सुखावतील पिके रोपे, पत घालवू नकोस अवेळी


नदी नाले ओहळ, तुझीच वाट पाहतात रे

कल्याण प्राण्यापक्षांचे, डागाळू 

 नकोस अवेळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action