शिक्षक
शिक्षक
भविष्य या देशाचे घडवतात शिक्षक
प्रगतीच्या पंखाने जिंकवतात शिक्षक
आम्ही विद्यार्थी सारे उपकृत मनःपूर्वक
अमृत आम्हा ज्ञानरुपी पाजतात शिक्षक
लागलो सत्मार्गाला घडलो खरेच पालक
शिकलो खूप काही जे सांगतात शिक्षक
घाव घालून चुकांवर ठरले मार्गदर्शक
संत ते खऱ्या अर्थाने ठरतात शिक्षक
सुटल्या त्या सवयी जीवनाला बाधक
वाटती साधेच मन जाणतात शिक्षक
कला विकसित मोठी जरी वाटती कडक
गुणदोष आमचे ते पारखतात शिक्षक
घडलोत उच्चशिक्षित आमची उच्च बैठक
आई वडिलांनंतर आठवतात शिक्षक
