राज
राज
कोणता हा दिवस आहे, कोणती ही रात
रात्रंदिन जळते माऊली, रोज विश्वास घात
देऊन हळद अंगभर ,अन् दागिन्यांचा साज
उरात स्वप्न संसाराचे, प्रवेश परवशता घरात
विश्वासाच्या साडीला, लागे कलंकाचे डाग
गुलाबाचे काटे डसती, उमजले तिला क्षणात
फसत जाई चाक रथाचे, क्षणोक्षणी अंगार
वेड्या भावना जळती, झेलत होणारा आघात
उमलतांना कळी, खुले फुलाचे ते राज
प्रश्न आजचे नव्हते,ही तर परंपरागत खाज
