भारत देशा
भारत देशा
भारतीय स्वातंत्र्याच्या क्षितिजावर
दिसु लागल्या काळ्या मोठ्या रेषा
धोक्यात आले संविधान आपले रे
उठ उठ भारत देशा...
विकासाच्या गाडीने बदललीय
जनतेच्या रोजगार संधीची दिशा
बुडत चालले मोठे उद्योग धंदे
उठ उठ भारत देशा...
ओघ संपत्तीचा होतोय परका
मिटल्यावर प्रगतीशील आशा
शेतकरी हवालदिल कर्जापायी
उठ उठ भारत देशा..?
धनदांडगे राजकारणाच्या मागे
गरिबाची गळचेपी होते हमेशा
निद्रिस्त झोपला मतदार राजा
उठ उठ भारत देशा...
घटनेने आम्हा दिधली समानता
विषमतेला गाडताना येई निराशा
जातीवरून भांडते येथील जनता
उठ उठ भारत देशा...
बुद्धांचा तर रोजच होते अपमान
खांद्यावर बसत आली कशी नशा
जगभरात आदर्श असून शास्ता
उठ उठ भारत देशा ...
