खेळ!!!
खेळ!!!
रोज एक मी खेळ खेळतो ! ! !
पैश्यांसंगे उठतो-बसतो . . .
काही देतो काही घेतो,
पैश्यासंगेच हसतो-बोलतो ! ! !
रोज एक मी खेळ खेळतो ! ! !
माणुसकीचा गळा घोटतो . . .
दंभ-स्वार्थाचे मुखवटे घेऊन,
स्वतःचीच मी फसगत करतो ! ! !
रोज एक मी खेळ खेळतो ! ! !
पैश्यासाठी रोज सकाळी,
लोकांसंगे धावत सुटतो . . .
पडतो . . . उठतो . . . आणि पाडतो,
जखमांवर मग मीठ चोळतो ! ! !
वासनेच्या नजरा घेऊन,
विक्षिप्तपणे मी तिला पाहतो...
कधीतरी मग ठेच लागते,
अन मग लंगडत पुढे चालतो ! ! !
कंटाळून मी मधेच थांबतो,
विचार करत मागे पाहतो . . .
पण गर्दीचा लोंढा येतो,
मलाही सोबत घेऊन जातो ! ! !
रोज एक मी खेळ खेळतो ! ! !
खेळता-खेळता मरुन जातो . . . .
मेलेल्यांच्या स्मशानभूमीत,
मरणाचा हा खेळ . . . पुन्हा रंगतो ! ! !
रोज एक मी खेळ खेळतो ! ! !
रोज एक मी खेळ खेळतो ! ! !