Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amrut Shivaji Dalvi

Tragedy

3  

Amrut Shivaji Dalvi

Tragedy

पोट ! ! !

पोट ! ! !

1 min
13.7K


बरं किती झालं असतं,

आपल्याला जर पोटच नसतं . . . .

आनंदात असते रहिले सगळे,

भुकेचं तर नावच नसतं . . . .


एक-मेकांच्या भावनांशी,

केली नसती कुणी लबाडी . . . .

आणि त्याच्या सुगंधाची,

केली नसती कुणी चोरी . . . .


मना सारखे जगलो असतो,

हवे तितके फिरलो असतो . . . .

आपल्याच माण्सांसोबत ऊगाच,

वाटणिसाठी भांडलो नसतो . . . .


हसरे चेहरे घेऊन सारे,

जग ही किती सुंदर असतं . . . .

उपाशी कुणीच राहिलं नसतं,

लोभाचं तर अस्तित्वच नसतं . . . .


लोकांच्या या गर्दितही,

एक्टं कुणी राहिल नसतं . . . .

आजीच्या त्या गोष्टी मधल्या,

माकडाने लोणी खाल्लं नसतं . . . .


बरं किती झालं असतं,

आपल्याला जर पोटच नसतं . . . .

आपल्याला जर पोटच नसतं . . . .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy