STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Tragedy

जाता -जाता ...ती म्हणाली...

जाता -जाता ...ती म्हणाली...

1 min
41.7K


जाता -जाता .हुंदका आवरत ती म्हणाली...

तू आहेस भोळा सांब ...सांभाळ स्वतःला

तुला सावरायला मी नाही आता ... तरीही...

मी असेनच रोमा- रोमात, आठवणींच्या रूपात


जाता -जाता .उसनं अवसान आणत ती म्हणाली...

रडू नकोस, कुढू नकोस, पश्चाताप करू नकोस

झालं गेलं विसरून जा ..पुन्हा नव्याने सुरुवात कर ...

माझं अस्तित्व, सहवास जाणवणारच तुला स्वप्नात


जाता -जाता .बळेच हसत ती म्हणाली...

चिंता करून नकोस रे ...मी नाही म्हणून काय झालं ?

इथपर्यंतचा प्रवास आपुला मज आठवत राहील ...

तू दिलेले सोनेरी क्षण... मी आयुष्यभर जपेन


जाता -जाता .हळवं होऊन ती म्हणाली..

फार नको रे मनाला लावून घेऊस .. सावर स्वतःला

ते इतकं सोप्प नाही कल्पना आहे रे मला ..पण

काय करणार रे... आता. तुझा - माझा मार्ग वेगळा


जाता -जाता .स्वतःला सावरत ती म्हणाली..

प्रेमाशिवाय हि खूप काही आहे रे जगात करण्यासारखं

फक्त एवढं लक्षात ठेव तू आहेस आईबाबांचं स्वप्न

विसरू नकोस कधी ,तुला गाठायचीत अजून ती यशोशिखर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy