STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

4  

Meenakshi Kilawat

Tragedy

तांडव महापुराचे

तांडव महापुराचे

1 min
27.6K


तांडव महापुराचे अचानक

नदीनाले ओथंबून आले

कित्येक गॉव पाण्याखाली

नैसर्गिक संकट ओढवले।।


उध्दवस्त केले महापुराने

हाहाकार माजला चारीकडे

पशुपक्षी व जीवजंतूच काय

मनुष्याचे जीवही तडफडे।।


हाहाःकार उरलेला फक्त

अतिशय भयानक प्रलयंकारी

ज्यावर बितली त्यांनाच कळे

कशी जगतिल ती पाण्यावरी ।।


स्वप्नांचे इमले पुराच्या तांडवात

असे धाडधाड कोसळले आहे

कष्ट पाण्यात गेले सर्व वाहून

डोळ्यात फक्त अश्रृ उरले आहे।।


नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही

पाऊसाळ्यात सतर्क असायला हवे

महापुर येण्या आधी नदीनाल्यावर

स्वच्छता मोहीम राबवायला हवी।।


दुष्ट प्रकोपामुळे हतबल न होता

खरी मानवता जागायला हवी

मदतीसाठी हात उचलोनी

पूरग्रस्तांना मदत करायला हवी।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy