विरहाची आग
विरहाची आग
पाऊस नाही, तू नाही
ना नवे सुचते गीत
असा पडलो एकटा
ना आता उरली प्रीत
किती वचनं दिली होती
किती आणाभाका प्रेमाच्या
सर्व गेलीस ना विसरून
उरल्या खुणा द्वेषाच्या
तुझ्या विरहाच्या आगीत
मी जळून झालो खाक
पण माझ्या मरणाची
तुला ना कळे आर्त हाक
आता फक्त कोरडा दिवस
नीरस वाटते रोजची रात्र
झुरतो नित्य आठवणींत
आभाळाचे हरपले छत्र
पाऊस वाटतोय नकोसा
तुझे प्रेम हवे मला
आनंदी क्षण यावे परत
मिठीत घ्यावे मी तुला