STORYMIRROR

Rahul Jagtap

Tragedy

4  

Rahul Jagtap

Tragedy

डेली डायरी -४

डेली डायरी -४

1 min
35.8K


बारामाही राबतोस तू

जरा अ‍ारामात उसंत नाही

कामाशी सर्कस आहे कि,

शांत राहणं पसंत नाही


उजाडला सुर्य की, संसाराची चुल पेटते

ध‍ावणार्‍य‍ा गाड्यां मागे स्पर्धा करतोस

ठरलेली चुकली की, स्वतहालाच कोसतोस

ठोक्याला १० च्या आँफिसात तू हजर दिसतोस


कागदं, संगणक सभोवतालची निर्जिव

तुला सजिव भासायला लागतात

हातातला पेन अन् कि-पँडच्या बटना

तुला हव्या तश्याच वागतात


घ्यावासा वाटला मोकळा श्वास तर

बायकोने बनवलेला टिफीन उघडतोस

काय वाढून ठेवलय पुढे

दुहेरी प्रश्न क्षणात पडतो


दमछाक होते , बाँसचा पाराही चढतो

अधुनमधून.. डोकं शांत ठेवून राबतोस

चुका नकोत म्हणून

असाच चालू राहतो महिनाभर हा खेळ

हातात पगार दिसतो

विसरल्यासारखा होतो स्वतहाला देऊ


केलेला वेळ, गुदमरल्या सारखही होत असेल

तरी तू श्वास मिळवतोस

रोजची जिंदगानी ही म्हणून

दुसर्‍या दिवसाची आशा जगवतोस....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy