झाडं
झाडं
(जंगल बदलत आहे - मालिका कविता-६ )
झाडं उभी ठाकतात
मातीत आपले पाय रोवून
आणि मूकपणे ऐकतात
उदास होत जाणारी जंगलधून
झाडांचे हे असे उदास होणे
भकास करते जंगल विराणे
पाऊस,वारा अन धूळ खात
झाडे गातात जीवनगाणे
एक बरंय झाडांचं की
हलत नाहीत मुळापासून
हजारो घाव पडले तरी
गुमान बसतात मूग गिळून
तुमचं आमचं काय जातं?
जेव्हा झाड निष्प्राण होतं?
कळेल तेव्हाच त्याचं ऋण
जेव्हा जगू झाड होऊन!