हत्ती
हत्ती

1 min

6.8K
आताशा
ते येतात आमच्या वस्तीत
कधी कुटुंबकबिल्यासह
तर कधी चुकल्यामाकलेल्या
एकांड्या शिलेदारासारखे
अशा वेळी बोबडीच वळते
आमच्या सगळ्या वस्तीची
त्यांचा विशाल आकार
आणि रौद्र रूप पाहून
विसरतो आम्ही
तेव्हा आमचे सगळे देव न बिव,
आणि एरवी उगाच फुलणारी
आमची मुर्दाड छाती
जरी आलेले नसतात ते गजराज
आम्हाला नष्ट करायला
ते तरी काय करणार हो?
जर आम्हीच केलंय अतिक्रमण
त्यांच्या निसर्गदत्त वस्तीला
आता भोगा तुमच्या विनाशी लीलांची फळं
किंवा जा शरण त्यांच्या रूर्द्रावताराला
ते समजून घेतीलच तुम्हाला,
पण तुमच्यातल्या जनावराचं काय?