जंगलधून
जंगलधून

1 min

13.4K
जंगलधून
(जंगलगाथा - कविता-४९)
हवेला जाणवते
पानांतली गहिवरती सळसळ
तेव्हा ऐकू येते झाडांमधून
एक अदभूत जंगलधून
गातात खळाळते झरे
हिरव्या डोंगरात मुरकत
आणि नाचू लागते रान
वाऱ्याच्या तालावर थिरकत
असा जंगलमहोत्सव
ठेक्यात साजरा होताना
फुलाफुलांत मैफल रंगते
आणि जंगलधून फुलवत जाते
पक्ष्यांचे सुरेल अन मोहक गाणे