डोंगर
डोंगर


उघडे बोडके डोंगर
आता बिलकुल बघवत नाहीत
टक्कल पडलेल्या माणसासारखे
दिसतात ते दुर्दैवी अन कपाळकरंटे
जंग जंग पछाडलं
तरी जंगल दिसेना त्यांच्या माथ्यावर
म्हणूनच डोंगर घसरु लागले
आपले उत्तुंग स्थान विसरून
माणसांनीच असे डोंगर पोखरून
भलत्या विकासाचे सूतोवाच केल्यावर
हिरवाई डोंगरांना सोडून जाणारच की
डोंगर मात्र उजाड,पोरके होऊन
अनंतकाळ वाट पाहत राहतील
एखाद्या वृक्षप्रेमी अवलियाची