जंगलवेड
जंगलवेड
1 min
14.3K
कुणी एक जंगलवेडा
चोखाळतो अनवट जंगलवाट
अन शिरतो गर्द वनात
तेव्हा रुजून येतं हिरवं रान
त्याच्या सदाबहार मनात
तो भटकत असतो तेव्हा
चालतं सोबत जंगलही
पायाखालची वाटदेखील
त्याची पाठ सोडत नाही
कसं वेडं मैतर हे
त्यानं या जंगलाशी केलंय
घरदार सोडून वेडा फिरतोय
आता जंगलच त्याचं घर झालंय
