जंगलवाटा
जंगलवाटा

1 min

6.8K
फिरून यावं म्हटलं एकदा
मनात ठाण मांडून बसलेल्या
या आडवळणाच्या जंगलवाटांनी
कशा मोहवून टाकत होत्या
गर्द हिरव्या रानात
पाखरांच्या मागे धावताना
वेड्या झालेल्या मनाला
मात्र आता एक आक्रीतच घडतंय,
जंगलातल्या या नागमोडी वाटा
वळवळत पार नाहीशा होतायत
कारण माणसं भन्नाट होऊन
पार वाट लावू लागलीत
आदिमानवाने जीवापाड जपलेल्या
या मनोहारी जंगलवाटांची..