बांबूच्या बनात
बांबूच्या बनात

1 min

1.3K
तसं नेहमीच
एक अनोळखी जंगल
दाटून राहिलेलं असतं
प्रत्येकाच्या हिरव्या मनात
पण बांबूच्या वनाची बात
काही औरच असते,
ते तर रस्त्यांच्या कडेने
किंवा एखाद्या मोहक वळणावर
जणू आपलीच वाट पाहत
आनंदाच्या बेभान लहरींवर
हलत डुलत असतं
या बांबूच्या नेत्र सुखद बनात
नेमकं काय गुपित लपलेलं असेल?
हे केवळ जाणतं जंगलच जाणत असावं
मात्र आपण इतके अजाण
की आपल्याला निसर्गतःच मिळालेल्या
या मौल्यवान संपत्तीलाही
अमानुष होऊन लुटून देतो
कुण्या अरसिक व्यापाऱ्याच्या
तितक्याच कठोर असलेल्या हातांत..