घोडे
घोडे


चौखूर उधळलेलेले घोडे
खिंकाळत केव्हाचेच दिसेनासे झालेत
लांबवर पसरलेल्या जंगलातून
त्यांच्या टापांचा आवाज
आता घुमतो शहरातल्या रस्त्यावर
जेव्हा एखादा टांगा नाहीतर घोडेवाला
पळवीत नेतो त्यांना
माणसाचे गुलाम झालेल्या
पाळीव प्राण्यांसारखा
बरेच माणसाळले असले
तरी विसरले नाहीत ते
आपली डौलदार चाल
जी आजही आठवण करून देते
त्यांच्या युद्धकालीन घोडदौडीची