Pandit Warade

Tragedy Abstract

4.9  

Pandit Warade

Tragedy Abstract

आडवाट ( गजल )

आडवाट ( गजल )

1 min
13.7K


 दाही दिशांस आता अंधार दाट आहे।

कैसा प्रवास व्हावा ही आडवाट आहे ।। १ ।।

बाहूत जोश कोठे खोटाच आव आहे ।

खोट्या महानतेची आलीय लाट आहे ।। २ ।।

काबाडकष्ट केले सांभाळण्या मुलांना ।

वृद्धाश्रमी तयांना राखीव खाट आहे ।। ३ ।।

राखावयास ज्यांच्या हाती दिले घराला ।

त्यांनीच आज केले सारे सपाट आहे ।। ४ ।।

जो पोसतो जगाला तो झोपतो उपाशी ।

मिष्टान्न घातलेले चोरास ताट आहे ।। ५ ।।

आहेत कोण सच्चे हे पारखून घ्यावे ।

येथे सभोवताली सारेच भाट आहे ।। ६ ।।

का "पंडिता" सुखाची आशा मनी धरावी ।

दुःखात जीवनाचा बाजारहाट आहे ।। ७ ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy