वंचित मुले निरागस फुले
वंचित मुले निरागस फुले
वंचित मुले निरागस फुले
ती नकोच असलेली...
तरीही, भाळी अनपेक्षित
चुकीचं कर्मफळ मिळालेली
ओळख न पाळख तयांची
पालक हरवून अनाथ झालेली
समाजातील वादळ संकटात
पालापाचोळ्यासम सापडलेली
सजीव निर्जीव अंतर ही
पचनी न पडलेली
आश्रित जीवन पदरी आलेली
दु:खाचे डोंगर चढण्यास धजलेली
चुक नसतानाही त्यांची
कोणते दुर्देव नशिबी भोगणारी
वाट काढत अंधार गर्तेतून
कधी उपाशी अन् कधी हताश होणारी
आसवांना गिळून
निधड्या मनानं
हळवं आयुष्य
व्यथित करणारी ...निरागस फुले