kishor zote

Tragedy

2.3  

kishor zote

Tragedy

चेहऱ्याआड ( अभंग रचना )

चेहऱ्याआड ( अभंग रचना )

1 min
21.1K


दुय्यम तो दर्जा | मिळे सदा स्त्रीला॥

निर्णय घ्यायला I बंदीवान॥१॥


लपवल्या साऱ्या I वेदना हास्यात ॥

राहते घरात । कष्टतच ॥२॥


बंधने सारीच I तिच्याच पायात ॥

बेडी ती हातात I मर्यादेची ॥३॥


अस्तित्व तिचेच I नाकारती सारे ॥

खोटेच ते वारे I प्रगतीचे ॥ ४ ॥


घरातील लक्ष्मी I घरात रहावी ॥

कधी ना मिळावी I मोकळीक ॥५॥


वाढा आणि रांधा | उष्टी तीच काढा ॥

गिरवावा पाढा | दररोज ॥६॥


घरकाम करा | उंबरठ्या आत॥

करावी ना बात I फिरोनीया ॥७॥


सारीच बंधने I तिनेच पाळावी ॥

वाट ना धरावी | बाहेरची ॥८॥


मुस्कटदाबी ती | तिची होत राही॥

स्वप्न तरी पाही I मुक्ततेचे ॥९॥


चेहऱ्याआड ती I बंदिस्त असते ॥

स्त्री सदा असते I कोठडीत ॥१०॥


Rate this content
Log in