तक्रार...!
तक्रार...!
तक्रार हा शब्द
माझी पाठ कधी सोडत नाही
तक्रारी शिवाय
एक दिवसही सरत नाही
अस का? तस का ? ची सुरुवात
अहो का ? च्या फलाटावर येते
आणि मग खरे तक्रारींचे
रामायण कळू लागते
आदर्शच्या चौकटीत
जीवन माझे सुरू असते
त्यासाठी मग रामायणाचे
हळू हळू महाभारत होते
माझ्या महाभारतात
शकुनी ,दुर्योधन सारे
राम ,रावणालाही घेऊन
रोज हजेरी न चूकता लावतात
मी माझ्याच विचारात
इतर पात्र शोधतो
राम, कर्ण ,अन हनुमानाची
भूमिका मीच निमूटपणे करतो
या तक्रारीच्या राज्यात
धर्माची भुमिका सारेजण घेतात
ती मोठ्या हौसेने
सडे तोड पारही पाडतात
जेंव्हा जेंव्हा तक्रारिंचे
नाट्य गुण्या गोविंदाने नांदते
तेंव्हा तेंव्हा मला
संन्यस्त व्हावे लागते
जीवन म्हणजे काय हे
आता क्षणोक्षणी कळते
जेंव्हा जेंव्हा ते नात्यांचे
दोरखंडानी माघारी ओढले जाते.....!
