देवाचा प्रसाद
देवाचा प्रसाद
शेंदूर फासूनी दगडाला
त्यात देवपण येतं
पंचपक्वानाचं ताट
त्याला अर्पण केलं जातं
भुकेने कासावीस होतो
जीव किती पोराचा
ताट पाहून दगडासमोर
शोध संपतो अन्नाचा
जेवढी भरता येईल
तेवढी झोळी भरतो
देवासमोर हात जोडून
मनोमन माफी मागतो
तृप्त होते मन
खाऊनी जेवणाचे ताट
विचार येई तरीही
रोज होईल का असा थाट
