छंद
छंद
छंद म्हणजे स्वओळख
दूर होई जीवनातील काळोख
मनाला मिळे समाधान
कधी वाढवी मोठी शान
छंद म्हणजे वेळेचा सदुपयोग
पण त्यासाठी जुळवावा लागतो योग
छंद जोपासता दूर होई ताण
जगला जाई क्षणनक्षण
छंद म्हणजे व्यक्त होणे
जगण्यावर शतदा प्रेम होणे
जगण्याची नवी दृष्टी
लोभस वाटे ही सृष्टी
छंद म्हणजे सतत शोध
शांत करी लगेच क्रोध
व्यक्ती तितक्या प्रकृती
छंदाचे प्रकार तरी किती
छंद म्हणजे कलेची जोपासना
करावी लागते त्यासाठी उपासना
कोणाला आवडे वाचन लेखन
कोण रमे करण्यात गायन
विचारांना चालना छंद देई
वेगळ्याच उंचीवर घेवून जाई
छंदातून होई नवनिर्मिती
निघून जाई मानसिक भीती
तहान भुकेचा पडे विसर
करता छंद जोपासण्याचा निर्धार
छंद जोपासा आनंदासाठी
स्वतःला परत घडवण्यासाठी