एकांत
एकांत
काहीतरी नक्कीच
बिनसलं आहे
भयाण शांतता
वाटत आहे
पक्ष्यांचा किलबिलाट
असह्य होतो
नकोनकोसा जीव
होऊन जातो
हा एकांत
मज छळतो
रोज फक्त
क्षणाक्षणाला मारतो
अगदी एकाकी
होत गेलो
माझ्यातील मीच
संपत चाललो
गर्दी आता
नकोशी होते
सगळेच कसे
परके वाटते
कोणीतरी साथ
मज द्यावी
दुःखावर माझ्या
फुंकर घालावी