कोरोनाची शिकवण
कोरोनाची शिकवण


कोरोना मानवाला खूप काही शिकवून गेला
जीवाभावाची कोण गंभीर प्रश्न उभा केला
उपासमारीत जगताना काळीज देऊन गेला
थोड्या दिवस का होईना गरीबाने गरीब जीवंत ठेवला
मदतीची याचना पोटासाठी हलवून गेला
आश्वासनाशिवाय तो उपाशी जगत राहिला
ज्याच्याकडे खूप काही होते तो घरात दडून बसला
गरीब उपाशी जगताना त्यांना दु:खाचा वारा नाही लागला
आपली रक्ताची काही माणसे हाडतूड करू लागली
आपल्याकडे येऊ नका असे वारंवार सांगू लागली
जवळ असलेली माणुसकी दाराबाहेरच ठेवली
चहा, पाणीसुद्धा कोणी विचारीना झाली
r>
यात जे दुर्दैवाने सापडले त्यांचा अंत झाला
काळजाच्या माणसांना दुरूनच सोडून गेला
बाहेरूनच हे जग प्रवाशासारखा जगला
धन, ऐश्वर्य इथेच दुसऱ्यांना तसेच सोडून गेला
नियम, शिस्त शाळेसारखी प्रत्येकाने जपली
त्यामुळेच तर त्यातून बरेचजण वाचली
कोरोनाने जीवनात संघर्ष आणि लढा शिकविला
काटकसरीचा मोलाचा सल्ला प्रत्येकाला दिला
नेहमीचे वर्दळ असलेले जग एकदाचे शांत झाले
दोन हाताचे काम सुटले हे भयंकर दु:ख वाट्याला आले
बेरोजगारीने पुन्हा भयानक जगाला विळखा घातला
दोन वेळच्या भाकरीचा नव्याने प्रश्न उभा केला