मराठी दिन - पवाडा
मराठी दिन - पवाडा


डफावर थाप,नाद तूणतुण्याचा
शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण
मराठी भाषेचे गातो गुणगाण जी जी जी
मुजरा माझा मराठी भाषेला
मराठी अस्मितेला,मातृभाषेला
मराठी माणसाच्या मना,मनाला जी जी जी
मराठी भाषा मराठी मनाचा
रसिक मराठी,साहित्यिकांचा
संघर्षमय मराठी जीवनाचा जी जी जी
योगदान मराठी भाषेचे
साधुसंत,महान पुरुषांचे
रक्तरंजित क्रांतीकारकांचे जी जी जी
जीवंतपणा मराठी भाषेचा
मराठी हृदयात जपण्याचा
गोडवा,रसाळवाणी शब्दांचा जी जी जी
विचार पेरा मराठी भाषेचे
तिच्या अमर अस्तित्वाचे
जीवंतपणा कायम राखण्याचे जी जी जी
आधार असावा मराठी भाषेला
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याला
मराठी भाषा जतन करण्याला जी जी जी
माहिती सांगावी पुढील पिढीला
तिच्यातील माधुर्य ऐकण्याला
शाळांत मराठी दिन साजरा करण्याला जी जी जी