तप्त उन्हाळा
तप्त उन्हाळा


आला,आला तप्त उन्हाळा
पक्षी झाडावर झाले गोळा
हिरव्या पालवीच्या छायेखाली
पक्षी मित्रांचा जमला मेळा
कुठेतरी चिवचिव चिमण्यांची
कुठेतरी कावकाव कावळ्यांची
तप्त उन्हाच्या कहराचा चटका
लाही लाही करतो जीवांची
भाषा पक्षांची जाणावी माणसाने
वाटीभर पाणी पाजावे पक्ष्यांना
जिथे असेल त्यांचे वास्तव्य
जीवदान द्यावे त्यांच्या रक्षणा
पक्षी देतात आनंद मानवाला
सत्कार्य होऊ द्या कर्मातून
इवलेसे घरटे द्या छान बांधून
चोचभर चारा घाल
ा तुमच्या हातून
तप्त उन्हाचा नको त्रास
नको हाल मुक्या जीवांचे
सर्वांनी व्हावे पक्षी मित्र
वाचवावे जीव सृष्टीचे
त्यांना नसतोच कधीही लोभ
नको असते धन, माडी,बंगला
सुखी,समाधानी जगतात जीवन
देतात प्रेरणा सुखाची मानवाला
नियम,शिस्त,कष्ट शिकावे
त्यांच्या पवित्र आचरणातून
आळस कायम झटकावा
हे शिकावे त्यांच्या नित्य जगण्यातून
अबोल मुक्या पक्षी, प्राण्यांचे
तुम्हीच आप्तजन सारे
होऊन त्यांचे मायबाप
जीव त्यांचे वाचवा रे