STORYMIRROR

Vijay Sanap

Abstract

5.0  

Vijay Sanap

Abstract

दळण

दळण

1 min
41.5K


अंधारल्या राती

बाई तांबड फुटलं

घरघर आवाजात

जातं घुमाया लागल ।।

कंदिलाच्या उजेडात

सुन दळणं दळते

तिच्या करून ओवीत

नाव भावचं ओवते ।।

पीठ पडे झराझरा

बांगडयाला ताल आला

खुराड्यात कोंबडयानं

पहाटीच बाग दिला ।।

बाई सरलं दळ्णं

रवी हळू हळू चढे

आंगणात प्रकाशाला

ऊन कोवळस पडे ।।

पहाठेच्या पहारी

उभी होते अंगणात

सुर्य देवा नारायणा

हात तुला रे जोडीत ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract