क्षितीज
क्षितीज


आकाश सागरासारखे अफाट
सागर आकाशापरी असीम
अफाट सागर
असीम आकाश
निराळीच उपमा
दोघांच्या मैञीला असते
मध्ये दोघांच्या
क्षितीजाचे सुवर्ण असते
पाठलाग करताना अनंत
दोघांनाही ती स्पर्शत नसते
आकाशाची ही गवसणी की
उगाच आलेली सागराला भरती असते..
कळत कुणालाच नाही
क्षितीज नावाची जगात
कुठलीच वस्तू नसते
फक्त बुडत्या सूर्यास ही
गम्मत माहीत असते
स्पर्श करता न येणारी
दृष्टीस न दिसणारी
क्षितीजरेषा......
ही असीम,अफाट
सृष्टीतली कल्पना असते .