फुलं आसवांची
फुलं आसवांची


फुलं आसवांची
आज आसवांची कातरवेळी फुलं झाली
काळोखाच्या सुगंधात निशीगंधाची माळ
झाली...
प्रकाशात विश्वास दिसता रजनीची
सकाळ झाली..
पुन्हा आसवांची सोनेरी सांजवात झाली
हळुहळू रखरखत्या घामाची दुपारही
शितल झाली ..
पापणीच्या काठावरुन ओघळुन त्याची
नदी झाली...
सावरता सावरुन स्वतःला वाट ओली
मोकळी झाली...
मोकळ्या टाहोतली घुसमट आज
बोलकी झाली ..
अंधारल्या पडद्याआडची प्रकाशाची
ज्योत झाली....
प्रयासपुर्ण दिलास्याची हृदयात
माञ धडधड झाली ...
प्रतिबींब बोलले हसले स्वतः शी
अशी अनामिक मैत्री झाली ..
आसवांची फुलं ओंजळीत येता
जीवन सुंगधी बाग झाली...!!!!