काही काही माणसं
काही काही माणसं


काही काही माणसं असतात
उलट अर्थ काढणारी
काही काही माणसं असतात
उलटं पुस्तकं चाळणारी
काही काही माणसं असतात
खोटं खोटं बोलणारी
खोटं सुद्धा बेमालूम
कस्तुरीत लपवून ठेवणारी
काही काही माणसं असतात
सत्याची कास धरणारी
वेळ येताक क्षणी
मूग गिळून बसणारी
काही काही माणसं असतात
मतलयी लहरी
काही काही माणसं असतात
मतलबी वाहणारी
काही काही माणसं असतात
अबोली अबोली
वेळ गेल्यावर मात्र
ठोकतात आरोळी