STORYMIRROR

Suraj Angule

Abstract

4  

Suraj Angule

Abstract

सोनपाखर नाचती

सोनपाखर नाचती

1 min
42.3K


चंदेरी शालू नेसून

एक चांदणी हसली

तेव्हा माझ्या रातीला ती

परीसारखी दिसली

रानानेही केला साजरा

सोहळा तिला पाहण्याचा

चंद्रालाही एकच ध्यास

तिच्या मनात राहण्याचा

फिदा झाले रानही

चांदणीच्या रुपावरती

काळोखाच्या पऱ्यासुद्धा

अंधाराची घागर भरती

जाग्या होऊन चांदण्या

पहाटेची फुलं वेचती

धुक्याच्या तालावरती

सोनपाखरं नाचती




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract